Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

0

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी उद्धव ठाकरे शुक्रवारी संध्याकाळी दाखल झाले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे घेणार पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, शिवसेना एनडीएत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असणार आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते.