Home ताज्या बातम्या वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरे

वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरे

0

वार्षिक स्नेहसंमेलन मोठया उत्साहात साजरे

आळंदी, दि. २४ फेब्रुवारी : वसंत ज्ञानपीठ संचलित ज्ञानराजा इंग्लिश स्कूल, या शाळेचा १३ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी उत्साहात पार पडला. ‘भारतीय संस्कृती’ ‘विविधता मे एकता’ या विषयावरील ‘भारतीय लोक नृत्य कलेचे’ विविध कार्यक्रम सादर झाले, तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ज्ञानराजा इंग्लिश मेडीयम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून आळंदीचे व शाळेचे  नाव उज्ज्वल करावे, असे शाळेचे अध्यक्ष प्रमोद शिंदे सर यांनी सांगितले.


वसंत ज्ञानपीठ संचलित ज्ञानराजा इंग्लिश स्कूल वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनृत्य, कोळी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. बालचमुंनी कला सादर करून पालक व ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. सर्व शिक्षक वृंद यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळे खूप सुंदर असे परफॉर्मन्स झाले प्राचार्या, रोहिणी चोपदार यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते श्री. रवींद्र चौधर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आळंदी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार पार पडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती, श्री.प्रमोद शंकरराव शिंदे (अध्यक्ष, वसंत ज्ञानपीठ), श्री.राजाभाऊ चोपदार (माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार), श्री. किशोर ढोबळे (उद्योजक पिंपरी-चिंचवड), श्री.मच्छिंद्र शेंडे (पोलीस अधिकारी,आळंदी पोलीस स्टेशन) श्री.तुषार घुंडरे (कार्यक्षम नगरसेवक, आळंदी नगरपालिका), श्री. ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी (सचिव, वारकरी महामंडळ), सौ. निकिता रमेश सणस (आदर्श सरपंच भुगाव पुणे), सौ. किरण शहाणे (शिक्षिका बाल मनोहर मंदिर इंग्लिश मेडियम स्कूल कोथरूड), सौ. विद्या गोडबोले (शिक्षिका बाल मनोहर मंदिर इंग्लिश मेडियम स्कूल कोथरूड), श्रीमती. शिल्पकला रंधवे (सहाय्यक शिक्षण अधिकारी,पुणे मनपा), अँड. माधवीताई निगडे, (विश्वस्त पंढरपूर देवस्थान समिती) आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.  हा सोहळा पसायदान म्हणून संपल्यानंतर पालक, पाहुणे आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले सर्व मान्यवर जेव्हा आम्हा शिक्षिकांचे आणि आमच्या मुलांचे कौतुक करतात, तेव्हा या सोहळ्यासाठी सर्वांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले.