Home ताज्या बातम्या ह्रदयाला छिद्र… चिमुकलीला बापाने टाकलं, शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षानं जीवदान दिलं

ह्रदयाला छिद्र… चिमुकलीला बापाने टाकलं, शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षानं जीवदान दिलं

0

मुंबई : शिवसेनावैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एका चिमुकलीला जीवदान मिळाले आहे. मुलगी झाली, त्यात जन्मत:च तिच्या ह्रदयाला छिद्र असल्याने पित्यानेच तिला वाऱ्यावर सोडले होते. मात्र, बापाने टाकले तरी आई ती आई असते. मायेनं आपल्या लेकराला घेऊन अनेक दरवाजे ठोठावले. त्यातलाच एक दरवाज होता, शिवसेनावैद्यकीय मदत कक्षाचा. मुलीच्या आईची हार्त हाक ऐकून हा दरवाजा उघडला अन् चिमुकलीवर मोफत उपचार झाले. 

शिवसेना वैद्यकीय कक्षच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया शिबिरात या लहान मुलीवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आपल्या लेकीच्या जीवदानाचं आनंद माऊलीसाठी गगनात मावनेसा झाला. म्हणूनच, बापानं टाकलं पण इतरांना सावरलं. त्या सावरलेल्या आणि पुढाकार घेतलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात जाऊन चिमुकलीच्या आईने आभार मानले. आभार पत्र आणि मिठाईचा बॉक्स घेऊन या चिमुकलीचे कुटुंबीय शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात आले. त्यावेळी, कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानून कृतज्ञताही व्यक्त केली.

Image may contain: 10 people, including Ghanshyam Patil and Mangesh Chivate, people smiling, people sitting and indoor

मुलगी झाली आणि जन्मतःच बाळाच्या हृदयाला छिद्र….बापाने या लहान मुलीला वाऱ्यावर सोडलं. बायकोला आणि लहान मुलीला घराबाहेर काढलं.. बाळ, बाळाची आई आणि आजी आमच्या कार्यालयात आले. आम्ही नेहमीप्रमाणे पुढील कार्यवाही केली.आणि आज ही मुलगी वाचली, असे मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन पीडित मुलीच्या आनंदीत आईचा फोटो शेअर करून म्हटलं आहे. विशेष म्हणजे याचे सर्व श्रेय राज्याचे संवेदनशील मंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना जाते. तर, ज्युपिटर हॉस्पिटल प्रशासन, ठाणे आणि SRCC हॉस्पिटल, मुंबई यांचे विशेष आभार आहेत. आम्ही केवळ निमित्तमात्र असल्याचं सांगत मदत केलेल्या कामाचे 100 टक्के श्रेयही चिवटे यांनी इतरांमध्ये वाटून टाकले.