Home ताज्या बातम्या होर्डिंग दूर्घटना झालेल्या जुना बाजार चौकात उभारलेल्या होर्डिंग काढण्यासाठी आमरण उपोषण

होर्डिंग दूर्घटना झालेल्या जुना बाजार चौकात उभारलेल्या होर्डिंग काढण्यासाठी आमरण उपोषण

0

मा. तौसिफ शेख यांच्या निरंकारी उपोषणाचा आजचा ३ रा दिवस. गेले २ दिवस तौसिफ शेख यांनी अन्न पाण्याविना उपोषण केले आहे. मागील वर्षी तौसिफ शेख यांनी पुण्याच्या हक्काच्या पाण्यासाठी पुणे महानगरपालिका येथे ६ दिवस उपोषण केले होते. उपोषण सोडल्यानंतर तौसिफ़ शेख याचा b . p. लो होऊन त्यांस कमला नेहरू हॉस्पिटल येथे ३ दिवस सलाईन वरती ठेवले होते. जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकात


५ ऑक्टोंबर २०१८ रोजी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगाडा कोसळुन चार निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला होता .
आता त्याच ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून त्याच परिसरात होल्डिंग उभारण्याचे काम पुन्हा चालू केले आहे.हे काम बंद करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते

तौसिफ शेख हे आमरण उपोषणाला बसले आहेत.