Home ताज्या बातम्या उस्मानाबादमध्ये शनिवारी रविवारी जनता कर्फ्यु

उस्मानाबादमध्ये शनिवारी रविवारी जनता कर्फ्यु

उस्मानाबाद । प्रतिनिधी । ३ एप्रिल : उमरगा व लोहारा तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात शनिवारी व रविवारी दिनांक चार व पाच एप्रिल रोजी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.

मात्र या काळात रुग्णालये, औषधी दुकाने, दूध व स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील. इतर सर्व आस्थापना बंद राहतील. असे सूचित केले. दरम्यान, जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक यांनी स्वतःहून आरोग्य तपासणीसाठी पुढे यावे. विशेषतः जिल्ह्यात इस्लामपूर मुंबई व दिल्ली येथून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे होम कोरंटाइनचे नियम पाळावेत. बाहेर फिरू नये, स्वतः व दुसऱ्याला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.