Home ताज्या बातम्या 189 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला बोरघाटातील अमृतांजन ब्रीज आजपासून पाडण्याचे काम सुरू

189 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला बोरघाटातील अमृतांजन ब्रीज आजपासून पाडण्याचे काम सुरू

मुंबई : मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटातील अमृतांजन ब्रीज आजपासून पाडण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू झाले आहे. आज सकाळपासून जवळपास 100 कामगार याठिकाणी काम करत आहे. या ब्रीजला यांत्रिक मशिनच्या सहाय्याने होल करून जिलेटिंग कांड्या भरून भुसुरूंग स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यत हा ब्रीज पाडला जाणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे हा पुल 189 वर्ष जुना आहे. ब्रिटीशकालिन असलेला हा पुल याअगोदर पाडण्याचे आदेश मुंबई महापालिकेला मिळाले होते. मात्र पुलावरून सतत सुरू असलेल्या वाहतूकीमुळे हा पुल पाडण्यात अडचणी येत होत्या. सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वेत्र वाहतूकबंदी करण्यात आली आहे. याच यामुळे महापालिकेने हा ब्रीज पाडण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार आता 189 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन ब्रीज इतिहासात जमा होणार आहे.