Home ताज्या बातम्या धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट

धारावी झोपडपट्टीला आरोग्यमंत्री व शिक्षणमंत्री यांची भेट

रंटाईन सुविधा, कोरोना उपचार विशेष रुग्णालयाची केली पाहणी

मुंबईतील धारावी झोपडपट्टी भागात कोरोनाचे सात पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम तसेच क्वारंटाईन सुविधा याचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी धारावीला भेट दिली. त्यांनी या भागात केवळ कोरोना उपचारासाठी उपलब्ध केलेल्या साई हॉस्पिटलला भेट देऊन व्हेंटीलेटर्सची संख्या वाढविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या. क्वारंटाईनच्या सुविधेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड देखील उपस्थित होत्या.