Home शहरे पुणे न्यूयॉर्कमध्ये वाघाला कोरोना, कात्रज प्राणीसंग्रहालयात प्रचंड खबरदारी

न्यूयॉर्कमध्ये वाघाला कोरोना, कात्रज प्राणीसंग्रहालयात प्रचंड खबरदारी

पुणे : कोरोना विषाणूची लागण फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही (Katraj Zoo) होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रज (Katraj Zoo ) प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिलं जात आहे.न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील (Corona Infection In Animals) वाघाला कोरोना प्रादुर्भाव झाल्याने आता सर्वच प्राणिसंग्रहालय दक्ष झाले आहेत. भारतीय केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण निर्देशानुसार उपायोजना करण्यात आल्या आहेत. कात्रजच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात दक्षतेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे (Katraj Zoo).प्राणीसंग्रहालयात येणारे प्रत्येक वाहन निर्जंतुक केलं जातं आहे. कर्मचार्‍यांना हॅण्ड ग्लोव्ह्ज, फेस मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.प्राणीसंग्रहालय निर्जंतुक केलं आहे. तसेच, प्राण्यांना (Katraj Zoo) खाद्यान्न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करुनच त्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच, कर्मचाऱ्यांना गम बूट वापरणेही सक्तीचं केलं आहे.कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच, अनावश्यकपणे वारंवार प्राण्यांजवळ न जाण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आलं आहे. शिवाय, वारंवार हात स्वच्छ करुनच प्राण्यांना आहार देण्यात यावे, अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.प्राण्यांमधील हालचालींवर लक्ष दिलं जात आहे. प्राण्यांना श्वासनाचा काही त्रास होतोय का? आरोग्य, हालचालींवर काही परिणाम झालाय का? याचं निरीक्षण केलं जात आहे. कोरोनापासून प्राण्याचा बचाव व्हावा म्हणून ही सर्व खबरदारी घेतली जात आहे.