Home गुन्हा माणगाववाडीतील अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा 1 लाखाचा मुद्देमाल नष्ट ; 5 गुन्हे दाखल

माणगाववाडीतील अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा 1 लाखाचा मुद्देमाल नष्ट ; 5 गुन्हे दाखल

0

माणगाववाडीतील अवैद्य हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा
1 लाखाचा मुद्देमाल नष्ट ; 5 गुन्हे दाखल

  • दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
  • अधिक्षक गणेश पाटील
    कोल्हापूर,दि. 9 (जिमाका)- हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी परिसरातील अवैद्य हातभटटी दारू निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने केलेल्या कारवाईत 5 गुन्हे नोंदविण्यात आले. 1 लाख 2 हजार 970 रुपये किंमतीचा साठा केलेला अवैद्य मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली.
    राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने आज माणगाववाडी परिसरात केलेल्या कारवाईत 5 गुन्हे नोंदविण्यात आले. मोठ्या प्रमाणात हातभटटीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, तयार दारू, गुळ इ. मुद्देमाल नाश करण्यात आला. दाखल केलेल्या गुन्हयांमध्ये 3050 लिटर कच्चे रसायन, 50 लिटर गावठी हातभटटी तयार दारू असा 1 लाख 2 हजार 970 रुपये किंमतीचा साठा केलेला अवैद्य मुद्देमाल नाश करण्यात आला असून या कारवाईत आरोपी अनिल खोत यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    या कारवाई वेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोध मोहीम राबवली असता आसपास मोठया प्रमाणात लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला. राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गन्हा अन्वेषण विभाग आणि जयसिंगपूर व हातकणंगले पोलीसांच्यावतीने केलेल्या कारवाईत 50 लोखंडी बॅरेल, 2 सिटेक्स टाक्या, 322 पत्र्याचे जये, 4 अॅल्युमिनीअम डबे, रवरी हौज पाईप इ.अवैध हातभटटी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा साठा मिळून आला.
    कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हयांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमध्ये जिल्हयांतील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हयांतील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद असल्याने अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या हातभटटी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहनही अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे. तसेच अशा प्रकारे मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येण्याची शक्यता असल्याने या लोकांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागव पोलीसांच्यावतीने सुमारे 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
    0000