Home ताज्या बातम्या लॉकडाऊन मध्येच मुंबईहून आले टेम्पो भरून लोक, सरपंचांच्या सजगतेने त्यांना केले होम क्वारन्टीन

लॉकडाऊन मध्येच मुंबईहून आले टेम्पो भरून लोक, सरपंचांच्या सजगतेने त्यांना केले होम क्वारन्टीन

0

उस्मानाबाद । प्रतिनिधी । ११ एप्रिल : जागतिक महामारी कोरोनाला अटकाव करण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. पर जिल्ह्यातील वाहने जिल्ह्यात येण्यास प्रवेश बंदी आहे. तरीही मुंबई येथील रेती बंदर येथे मजुरी करणारे चौदा लोक आज शुक्रवारी (१० एप्रिल) सकाळी सहा वाजता एका खाजगी वाहनाने उस्मानाबाद तालुक्यातील बामणी गावात दाखल झाले आहेत. यामुळे गावात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे लोक गावात आल्याचे माहीत होताच, गावातील आशा कार्यकर्ती यांनी त्यांची भेट घेऊन सरपंच आणि पोलीस पाटील यांना याबद्दल सूचना दिली. त्यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेऊन त्यांचे हातावर होम क्वारंटीन शिक्का मारण्यात आला. यात पाच महिला, सहा पुरुष आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. लहान मुले सोडून सर्व लोक तीस पस्तीस वयोगटातील आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे. लॉकडाऊन काळात जमाव बंदी आणि स्थलांतर बंदी आहे. असे असतानाही मुंबई येथील रेती बंदर येथुन तेरा चौदा लोक एका खाजगी वाहनातून गावात दाखल झाले आहेत. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सध्या बेंबळी पोलिस ठाण्यात सदरील खाजगी वाहन जप्त करण्यात आले आहे. चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई येथून हे वाहन आणि लोक गावापर्यंत कसे काय आले याची चौकशी केली जात आहे.
दरम्यान केशेगाव (ता. उस्मानाबाद) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या सर्वांना नेण्यात आले असता. या लोकांच्या हातावर केवळ होम क्वारंटीन शिक्का मारण्यात आला आहे. मात्र संबंधित लोकांचे नाकातील आणि घशातील स्वब परीक्षणासाठी न घेताच त्यांना दवाखान्यातून पाठवून देण्यात आले आहे. यामुळे हे लोक पॉजिटीव्ह आहेत की निगेटीव्ह आहेत. हे कळण्यास मार्ग राहिलेला नाही. केशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना असेकसे दवाखान्यातून बेफिकीर पद्धतीने पाठवून दिले. हा प्रश्न ही उपस्थित झाला आहे. दरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही