Home ताज्या बातम्या वारजे परिसरातील ५० कुटुंबाना १ महिन्याचा किराणा माल

वारजे परिसरातील ५० कुटुंबाना १ महिन्याचा किराणा माल

0

पुणे : सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने मंगळवारी वारजे परिसरातील अल्प उत्पन्न गटातील ५० कुटुंबाना १ महिन्याचा किराणा,जीवनोपयोगी वस्तू घरपोच देण्यात आल्या.यामध्ये ५ किलो गहू, ५ किलो तांदुळ, १ किलो तूरडाळ, २ किलो तेल, २ किलो साखर, १/२ किलो चहा पावडर , १ किलो मीठ, हळद , मिरची पावडर, जिरे , मोहरी प्रत्येकी १०० ग्रॅम, अंघोळीचे साबण २, कपड्याचे साबण २, टुथपेस्ट १०० ग्रॅम, खोबरेल तेल इत्यादी वस्तुंचा सामावेश होता .
या वाटपासाठी सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद , पुणे मनपा, दिपकमामा भोसले, ऋषिकेश रजावात, आनंद देशपांडे, अमजद अन्सारी, चेतन मेस्त्री, किरण साबळे यांनी परिश्रम घेतले.