Home ताज्या बातम्या लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने खाजगी कोचिंग क्लासेसला 3 मे पर्यंत बंदी

लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने खाजगी कोचिंग क्लासेसला 3 मे पर्यंत बंदी

0

अलिबाग, जि. रायगड : करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 मधील 10 नुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते.

मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस दि. 03 मे 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.

या आदेशानुसार कार्यवाही न करणाऱ्या व्यक्ती,नागरिक वा आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्ती,नागरिक यांच्याविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे.