Home गुन्हा जिवनावश्यक वस्तूंचा साठा व अवैध दारू विक्री करणा-यावर कारवाई

जिवनावश्यक वस्तूंचा साठा व अवैध दारू विक्री करणा-यावर कारवाई

0

सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले असताना खालील पोलीस ठाणे हद्दीत सदर नियमांचे उल्लंघन
केले बाबत गुन्हे दाखल आहेत.

मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत:-

दिनांक 14/04/2020 रोजी 20.30 वा. सुमारास 04 आरोपी पैकी आरोपी नं.1 रा.बोडणी, आरोपी नं.2 रा.शहापूर, ता.अलिबाग
आरोपी नं.3 रा.पीरकोन ता.उरण यांनी त्यांच्या ताब्यातील साईसागर मच्छिमारी बोट
रजि.क्रं.आय.एन.डी-एम.एच.07/एम.एम.1586 नावाच्या बोटीमध्ये बोटमालक आरोपीत क्रं.04
रा.पनवेल याचे सांगणेवरून व संगनमताने विनापरवाना बेकायदेशीररित्या सुमारे 17000
लिटर सुमारे 11,10,440/- रुपये किमतीचा डिझेल साठा कोणत्याही प्रकारचा साठा करण्याचा
परवाना नसताना स्वतःचे ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळुन आला. सदर गुन्ह्यातील 03
आरोपी यांना दिनांक 15/04/2020 रोजी 04.20 वा.सुमारास अटक करण्यात आले असून
पोलिसांनी डीझेल, लाकडी फायबर बोटीसह एकूण 21,10,440/- रुपये किमतीचा माल हस्तगत
केला आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाणे येथे गुरनं 27/2020 जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3,7 भा.द.वि.सं कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि डी.टी.सोनके हे करीत आहेत.

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत:-

दिनांक 15/04/2020 रोजी 16:15 वा. सुमारास आरोपी रा. समतानगर खोपोली ता.खालापूर याने एकूण 858/- रुपये किंमतीची देशी संत्रा ब्ल्यु.जी.एम.नावाची तयार दारू विक्री करण्यासाठी विनापरवाना बेकायदेशिर पणे आपले स्वत:चे ताबे कब्ज्यात बाळगले स्थीतीत मिळुन आल्या असुन, मा.जिल्हाधिकारी सो.रायगड अलिबाग यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुरनं 62/2020 भा.द.वी.स.कलम 188 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासपोहवा/ 1281 शिद हे करीत आहेत.

कर्जत पोलीस ठाणे हद्दीत:-

दिनांक 15/04/2020 रोजी 12:30 वा. सुमारास महिलाआरोपी रा.फातीमानगर झोपडपटटी ता.कर्जत हिने एकूण 960/- रुपये
किमतीची विना परवाना गैरकायदा, गावठी हातभटटीची तयार दारु मौजे फातीमानगर झोपडपटटी येथेआपले स्वत:चे ताबे कब्जात बाळगले स्थितित मिळुन आली. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुरनं 87/2020 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (d)(e)(f) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना/1432 राठोड हे करीत आहेत.

मुरुड पोलीस ठाणे हद्दीत:-

दिनांक 15/04/2020 रोजी 18:15 वा. सुमारास आरोपी रा.पारगान ता.मुरुड यांनी बेकायदेशिररित्या एकूण 11,100/- रुपये किंमतीची
गूळ नवसागर मिश्रीत रसायन वापरून दारू गाळण्याची भट्रटी लावून गावठी दारू तयार करून मौजे नागशेत येथे नदी किनारी जंगल भागात स्वत:चे ताबेकब्जात बाळगले स्थितीत मिळून आला असताना पोलीसांची चाहुल लागताच व पोलीसांनी त्यास ओळखले असताना सुदधा तो तेथे न थांबता निघून गेला. याबाबत मुरुड पोलीस ठाणे येथे गुरनं 20/2020 दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (b)(c)(f)(e) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना/1063 आंबेतकर हे करीत आहेत. तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, शासनाने सद्यस्थितीत निर्गमित केलेले नियम पाळावेत तसेच या नियमांची कोणी पायमल्ली करीत
असेल तर सबंधित पोलीस ठाणे अगर नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावे.