Home बातम्या लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट न देता अर्ज/तक्रारी पाठवावेत ई-मेलवर

लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट न देता अर्ज/तक्रारी पाठवावेत ई-मेलवर

0

अलिबाग, जि. रायगड : शासनाने करोना विषाणूचा (COVID-19) प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897,दि.13 मार्च 2020 लागू केला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दि.31 मार्च 2020 पर्यंत प्रत्यक्ष भेट न देता ई-मेलद्वारे आपले अर्ज/तक्रारी संबंधित कार्यालयास पाठविण्यात याव्यात , असे जिल्ह्यातील नागरिकांना  आवाहन करण्यात आले  होते.

मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दि.3 मे 2020 पर्यंत प्रत्यक्ष भेट न देता आपले अर्ज/तक्रारी www.raigad.gov.in या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.