Home ताज्या बातम्या पुणे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने गुरुवारी तडकाफडकी बदली

पुणे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने गुरुवारी तडकाफडकी बदली

0

पुणे :  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईनंतर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशातच बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने गुरुवारी तडकाफडकी बदली केली आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ससून रुग्णालयामध्ये मागील 15 दिवसांमध्ये 38 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात डॉ. चंदनवाले यांना अपयश आल्याने त्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उप अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे डॉ. चंदनवाले यांच्या पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने ससूनच्या नवीन इमारतीला कोविड-19 रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी जुन्या इमारतीमधील 27 आणि 28 वॉर्डमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. पुण्यात दररोज एक तरी मृत्यू होत असून मागील 16 दिवसात हा आकडा 38 वर पोहचला आहे.

देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण पुण्यात अधिक आहे. यामुळेच त्यांची बदली झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या बाबत काही राजकीय नेत्यांनी देखील तक्रार केली होती. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच पुण्यातील मृत्यूंचा आकडा वाढल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच शासनाने कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात अली असल्याची चर्चा आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सध्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. आता या पदाची पूर्णवेळ जबाबदारी डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे देण्यात आली आहे. तर ससूनचा पदभार डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

याबाबत बोलताना डॉ.अजय चंदनवाले म्हणाले, शासन आदेशाचे पालन करण्यात येईल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदावर बदली झाली असून शुक्रवारी