Home गुन्हा राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंडासहीत ३६ हजार ९३५ वाहने जप्त

राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंडासहीत ३६ हजार ९३५ वाहने जप्त

0

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात केलेल्या विविध कारवाईत २९ दिवसातील ही कारवाई आहे. राज्याराज्यांमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी आदेश जारी करण्यात आले. याच आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५५ हजार ३९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २२ मार्च ते १९ एप्रिलच्या पहाटे चार वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. यात ५६७ जणांवर ‘होम क्वारंटाइन’चे आदेश धुडकावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तसेच व्हीसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी व्यक्तींविरोधात १५ गुन्हे नोंदवण्यात आले.

आतापर्यन्त पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ७२ हजार ६४४ तक्रारी नोंद झाल्या आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी ३६ हजार ९३५ वाहने जप्त करण्यात आले आहेत. तसेच अवैध वाहतुक प्रकरणी १०५१ गुन्हे दाखल करत ११६४५ जणांना बेडया ठोकल्या आहेत. यात एकूण २ कोटिं ६ लाख ७३ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान राज्यभरात ४० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनाच टार्गेट केले जात आहेत. आतापर्यन्त पोलिसांवर हल्ले केल्याप्रकरणी १०५ गुन्हे दाखल झाले असून ३०१ जणांना बेडया ठोकण्यात आल्या आहेत.