Home ताज्या बातम्या पी-४ पॅटर्नमुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सुरक्षा संसाधने वाटप

पी-४ पॅटर्नमुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात सुरक्षा संसाधने वाटप

0

पिंपरी चिंचवड शहर हद्दीत खासगी सुरक्षारक्षक पुराविणा-या पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम (पी-4) या उपक्रमाच्या पॅटर्न मुळे सिक्युरिटी एजन्सीकडून आयुक्तालयांतर्गत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. तसेच याअंतर्गत खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक पोलिसांसोबत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्य म्हणून रस्त्यावर दिसले.
लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेल्या जिल्हाबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात 65 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. त्या ठिकाणी खासगी कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांच्या चालक व मालकांसह बंदोबस्त करत आहे.

लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी पोलिसांना मदत म्हणून खासगी कंपन्यांच्या सुरक्षारक्षकांनी स्वतःहून पोलिसांसोबत रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करण्याचा निर्धार केला. त्याअंतर्गत अनेक सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरून पोलिसांना सहकार्य करीत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही देखील आपली एक सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे पी-4 सिक्युरिटी एजन्सीकडून अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना 200 लिटर सॅनिटायझर, एक हजार मास्क आणि दोन हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पी-4 चे मुख्य समन्वयक सचिन मोरे, सोमनाथ गायकवाड, संभाजी बुचडे, विष्णू जाधव, बालाजी माने, अंकुश ढमढेरे, राजेश मुरगीरकर, प्रवीण भोसले, दिलीप सोनवणे, दिनेश रायकवार, प्रमोद देशमुख, कुशल लोणकर, किमंतीलाल शर्मा, अनिल बेंद्रे, आनंद सावळे, ज्ञानेश्वर गायकवाड,शरद शिंदे आदी सहकारी उपस्थित होते.