Home गुन्हा अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावठी दारूचा व्यवसाय करणारे अटक

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गावठी दारूचा व्यवसाय करणारे अटक

0

परवेज शेख पुणे, दि. १८ एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेश देण्यात आले आहेत. अशातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काही महाभाग गावठी दारूचा व्यवसाय करताना पोलिसांनी पकडले आहेत. त्यांच्याकडून साडेसात लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दि. १७ एप्रिल रोजी पुणे शहरातील खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथका(पश्चिम)तील पोलीस अधिकारी व कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात अवैध जुगार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कर्मचारी उदय काळभोर व संदीप साबळे यांना मिळालेल्या बातमीवरून कृष्णानगर, घोरपडीगाव, बीटी कवडे रोड, पुणे येथे पोलिसांनी सापळा लावून गावठी दारूची वाहतूक करणारा सुपर कॅरी टर्बो टेम्पो ताब्यात घेण्यात आला. टेम्पोमध्ये २५ प्लास्टिकचे कॅन, प्रत्येक कॅनमध्ये अंदाजे ४० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू एकूण १००० लिटर, २६ प्लास्टिकचे मोकळे कॅन असा सर्व मिळून साडेसात लाखांचा
माल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांना संशय येऊ नये व पकडले जाऊ नये म्हणून टेम्पोवर अत्यावश्यक सेवा म्हणून बोर्ड लावला होता. टेम्पोच्या मागील हौदामध्ये गावठी दारूचे भरलेले कॅन ठेवलेले होते. ते कॅन दिसू नयेत म्हणून त्यावर जनावरांचा चारा रचून ठेवला होता.