Home ताज्या बातम्या गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी-चंद्रकांत पाटील

गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी-चंद्रकांत पाटील

0

मुंबई : पालघरमधील तीन जणांच्या हत्याकांडामुळे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. या घटनेननंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

१६ मार्चला पालघर जिल्ह्यात जमावाने तीन साधनेची चोर समजून हत्या केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे दोषींवर तात्काळ करावी करावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आहे, मुख्यमंत्रीनी तात्काळ या घटनेनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधण्याची गरज होती मात्र, मुख्यमंत्र्यांना चार दिवसानंतर वेळ मिळाला अशी टीका चंदकांत पाटील यांनी केली आहे. राज्यात काही दिवसात गंभीर घटना घडत आहेत. ठाण्यातील एका तरुणाला मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. राज्यात कडक लॉकडाऊन असताना देखील हजारोच्या जमाव वांद्रे स्थानकावर येतोच कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाला कोणीही धार्मिक रंग देऊ नये. हा गैरसमजुतीमधून झालेला प्रकार आहे. आतापर्यंत १३० जणांना अटक केली असून ९ अल्पवयीन आरोपीना बालसुधार गृहात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं