Home ताज्या बातम्या राशीभविष्य: 22.4.2020

राशीभविष्य: 22.4.2020

0

प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या दिवसावर होत असतो. त्यामुळे आज काय आनंदाची बातमी मिळणार आणि कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष- बेजबाबदार वृत्तीमुळे कुटुंबाच्या भावना दुखावू शकता. बोलण्याआधी दोनवेळा विचार करा. प्रेमात तुमच्या पदरी निराशा पडेल. पण हार मानू नका कारण विजय शेवटी तुमचाच असेल.

वृषभ- तणाव आल्यानं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांमध्ये अडकण्याचे टाळा. गुंतवणूकीत अत्यंत सावधगिरी बाळगा.

मिथुन – घाईत गुंतवणूक करू नका. आज आपल्याला खूप वाईट वाटू शकतं. आपण आपला विश्वास तुटू शकतो. कोणतंही बेजबाबदार कार्य करू नका ज्यासाठी आपल्याला नंतर पश्चात्ताप करावा लागेल.

कर्क- नकारात्मक विचार आल्या शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.जुन्या गुंतवणूकीमुळे उत्पन्नात वाढ होईल. प्रेम खुलत जाईल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता आवश्यक आहे.

सिंह – आज आपण पैसे कमवलेत तरी हातात काहीच उरणार नाहीत. वैयक्तीक मतभेदांमुळे आज आपल्याला राग येईल. वैवाहिक जीवनात काही निर्णय पार्टनरला न सांगता घेतले तर हिताचे ठरतील.

कन्या- उत्तम आरोग्य आणि शांत मन राहण्यासाठी व्यायाम आणि योगची मदत घ्या. छंद जोपासणं आणि मनोरंजन करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

तुळ – प्रेम प्रकरणात आजचा दिवस कठीण जाईल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता बाळगणं महत्त्वाचं आहे. पार्टनरसोबत छोट्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतात.

वृश्चिक – खर्चावर वेळीच नियंत्रण घाला. एकतर्फी प्रेमामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आपला वेळ आणि शक्ती चांगल्या कामांसाठी घालवा. घराबाहेर पडणं धोक्याचं ठरेल.

धनु – आर्थिक चणचण जाणवेल. निर्णय घेण्याआधी परिणामांचा विचार करा. प्रेमात सदसदविवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्या.

मकर – तणावामुळे चिडचि़ड होईल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. त्रयस्थ व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे आपल्या आणि प्रिय व्यक्तीच्या नात्यात अंतर येणार नाही याची काळजी घ्या.

कुंभ – आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे. जोडीदाराच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना वाईट वाटू शकते. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवा.

मीन- घाईत गुंतवणूक करू नका. घरगुती समस्या सोडविण्यासाठी आपली बुद्धिमत्ता आणि प्रभावाचा वापर केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आज आपलं मत समोरच्याला समजेल असं मांडा.