Home ताज्या बातम्या कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांना १७१ कोटींचा निधी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार

0

  मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य व औषधे खरेदी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आतापर्यंत एकूण १७१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            कोवीड-१९ विषाणूचा राज्यातील वाढता फैलाव लक्षात घेता मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येणारा निधी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर खर्च करता येतो का याबाबतीत आयुक्त, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची श्री.वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्याशी चर्चा करून विभागीय आयुक्तांना तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून  विभागीय आयुक्तांना आतापर्यंत १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती       श्री.वडेट्टीवार यांनी दिली

            श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे पसरलेला आजार नियंत्रित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना आज ८१ कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला असून हा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले असून याबाबत दिनांक २१ एप्रिल रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी कोकण विभागासाठी ४० कोटी, पुणे विभागासाठी १५ कोटी, नागपूरसाठी १० कोटी, अमरावतीसाठी ६ कोटी तर औरंगाबाद विभागासाठी १० कोटी, याप्रमाणे एकूण ८१ कोटींचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्यात कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी, नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या टप्यात कोकण विभागासाठी १५कोटी, पुणे विभागासाठी १० कोटी, नागपूर विभागासाठी ५ कोटी, अमरावती विभागासाठी ५ कोटी, औरंगाबाद विभागासाठी ५ कोटी,  नाशिक विभागासाठी ५ याप्रमाणे ४५ कोटी निधी वितरीत करण्यात आलेला आहे.  असे एकूण ९० कोटी आणि तिसऱ्या टप्यात ८१ कोटी असे आतापर्यत एकूण १७१ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

            श्री.वडेट्टीवार म्हणाले, वितरित करण्यात आलेल्या निधीमधून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च तपासणी/छाननीसाठी सहाय्य, Contact Tracing शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपभोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च व व्हेंटीलेटर, हवा शुद्धीकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु