Home ताज्या बातम्या दि.01 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

दि.01 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

0

अलिबाग, जि. रायगड : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 एप्रिल 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-

       जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या  (01/03/2020 ते 21/04/2020) – 1 हजार 589, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा  incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 3 हजार 970, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 770, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 2 हजार 100, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 42, मयत नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1) -2, कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या (पनवेल मनपा-14, पनवेल ग्रामीण 4) एकूण 18.

 सद्य:स्थितीत करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या– (पनवेल मनपा-25, पनवेल ग्रामीण-2 उरण-4, श्रीवर्धन-5, कर्जत-1,पोलादपूर-1) एकूण 38 .

रुग्णालयात दाखल असलेल्या नागरिकांची संख्या व त्यांच्या तब्येतीची सद्य:स्थिती-

मुंबई फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड- 1 (गंभीर),‌ उपजिल्हा रुग्णालय पनवेल-20 (उत्तम),  नवी मुंबई मनपा रुग्णालय वाशी- 2 ( 1 गंभीर, 1 उत्तम), सेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई – 2 (उत्तम), जोगेश्वरी रुग्णालय मुंबई- 1  (उत्तम),  अपोलो रुग्णालय बेलापूर – 1 (गंभीर),  सायन रूग्णालय मुंबई- 1 (उत्तम), जगजीवन रुग्णालय मुंबई -1 (उत्तम), डी वाय पाटील रुग्णालय नवी मुंबई – 1 (उत्तम), एम. जी. एम. रुग्णालय कामोठे – 6 (उत्तम), वेदांत रुग्णालय  ठाणे- 1 (उत्तम), फोर्टीज रुग्णालय नवी मुंबई – 1  (उत्तम).  

नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-

   जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 521, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या- 485, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 413, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 14, आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 58, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve  असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)- 38,  ‘+’ ve रिपोर्ट असलेले  उपचारानंतर  ‘-’ ve रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-18, मयत नागरिकांची संख्या- 02 (पनवेल मनपा-1, पोलादपूर-1 ).

 दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-1 (पनवेल मनपा -1 ),

दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण – 2 (पनवेल मनपा-1, पनवेल ग्रामीण-1)अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.