Home शहरे अहमदनगर पालघर येथे साधूंच्या झालेल्या हत्येची चौकशी करा:जिवन ज्योत फाउंडेशन याचे मुख्यमंञ्याना निवेदन

पालघर येथे साधूंच्या झालेल्या हत्येची चौकशी करा:जिवन ज्योत फाउंडेशन याचे मुख्यमंञ्याना निवेदन

0

अहमदनगर( प्रतिनिधी ) :- पालघर जिल्हयातील गडचिंचले येथील साधूंच्या झालेल्या हत्येचा जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निषेध केला आहे.
जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेने पालघर घटनेचा निषेध करीत वेळीच कारवाई न झाल्यास साधूसंतांच्या संतापाने होणाऱ्या परिस्थितीची व परीणामाची कल्पना देणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. सदर पत्रात त्यांनी म्हटले आहे की सदर जमावाने या गावांमध्ये पोलिसांच्या समक्ष लाठीकाठी दगड अशा मिळेल त्या साधनांनी बेदम मारहाण केली त्यामुळे पंचदशनाम जुन्या आखाड्याचे संत श्री कल्पवृक्षगिरी महाराज,महंत सुशीलगिरी महाराज व वाहन चालक निलेश तेलगडे या तिघांना ही प्राणास मुकावे लागले अशी निंदनीय घटना घडली आहे.लॉकडाऊन सुरू असतांना देखील या घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित असून ही त्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका संशयास्पद वाटते.महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्यात प्रशासनासमोर अशी घटना घडते ही लाजिरवाणी व चिंतेची बाब आहे.संबधित साधूंचे वय विचारात घेता केवळ काही बहाण्याचे निमित्त करून घडलेली घटना पूर्वनियोजित असावी अशी वाटते.
एवढी करुणामयी घटना घडुन ही तथाकथित संस्कृती रक्षक तसेच मानवतावादी कार्यकर्त्यांनी व तत्पर मिडियाने याची दखल न घेणे हे निंदनीय आहे.तरी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी, संबधीत पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तातडीने कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.या घटनेमुळे पंचदशनाम जुन्या आखाड्याचे सर्व नागा साधू अत्यंत संतप्त झालेले असून या घटनेची चौकशी होऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास लॉकडाऊन नंतर हे नागा साधू आक्रमक होऊ शकतात व तसे झाल्यासअत्यंत वाईट परिस्थिती उदभवू शकते तरी या प्रकरणी आपण तातडीने कार्यवाही करण्याची विनंती निवेदनात केली आहे.या गोष्टीचा आपण सर्व निषेध करत आहेत दोषींवर लवकर कठोर कार्यवाही करावी अन्यथा लाॅकडाऊन संपल्यानंतर जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला.