Home शहरे पुणे चांद तारा मशीद परिसरात वैद्यकीय सेवा भारतीय जैन संघटना,युनानी मेडिकल कॉलेज चा उपक्रम

चांद तारा मशीद परिसरात वैद्यकीय सेवा भारतीय जैन संघटना,युनानी मेडिकल कॉलेज चा उपक्रम

0

३५० रुग्णांवर औषधोपचार 
पुणे :  भारतीय जैन संघटना,युनानी मेडिकल कॉलेजतर्फे  नाना पेठ मधील चांद तारा मशीद  परिसरात मोफत  वैद्यकीय सेवा  पुरविण्यात आली. लॉक डाऊन काळात नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या परिसरात वैद्यकीय सेवा  पुरविण्याचा हा उपक्रम या दोन्ही संस्थांकडून सुरु आहे. डॉ रफी महमद चौधरी यांच्या पथकातील डॉक्टरांनी उपचार केले. समर्थ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम,नाना पेठ पोलीस चौकीचे श्री .शिकीलकर,आणि सहकाऱ्यांनी संयोजनात मदत केली.  ३५० रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. चांद तारा मशीद ट्रस्ट च्या वतीने आभार मानण्यात आले.