Home ताज्या बातम्या पोलीस कर्मचारी, बेस्ट बस कर्मचारी,विद्युत पुरवठा कर्मचारी यांना फेस कव्हर शिइल्ड (face cover shield) चे वितरण करण्यात आले

पोलीस कर्मचारी, बेस्ट बस कर्मचारी,विद्युत पुरवठा कर्मचारी यांना फेस कव्हर शिइल्ड (face cover shield) चे वितरण करण्यात आले

0

मुंबई :- शफीक शेख

आज जगावर, आपल्या देशावर, आपल्या महाराष्ट्रवर आणि खासकरून आपल्या मुंबई वर कोरोना वायरस चा (covid-19) विळखा दिवसेंदिवस वाढत च चालला आहे. सरकारी आदेशानुसार 3 मे पर्यंत लॉकडाउन देशभर जारी करण्यात आला आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात देखील लॉकडाउन वाढवला जाऊ शकतो. या कठीण काळात मुंबई कराच्या सुरक्षेतेच्या करिता मुंबई पोलीस जीवाची पर्वा न करता रात्र दिवस आपली सेवा देत आहे. त्याचप्रमाणे बेस्ट कर्मचारी देखील जीवाची पर्वा न करता वीज पुरवठा खंडित न होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. म्हणूनच सामाजिक बांधिलकीतुन महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष श्री. परेश तेलंग यांच्या पुढाकाराने नागपाडा पोलीस कर्मचारी बंधूंना व ताडदेव विभाग बेस्ट कर्मचारी बंधूंना आज फेस कव्हर शिइल्ड (face cover shield) चे वितरण करण्यात आले. ह्या वितरण मनसे बेस्ट कर्मचारी सेनेची चिटणीस श्री. रूकेश गिरोल्ला , महाराष्ट्र सैनिक श्री. कुनाल लगाडे ,श्री. कमलेश लगाडे, श्री. निखिल सांगळे यांनी पार पाडले.


जय हिंद जय महाराष्ट्र!