Home शहरे अमरावती वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले ,बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील घटना

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले ,बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील घटना

0

पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

खामगाव ( सुनिल गुळवे ) – अवैध रेती वाहतूक करणा-या टिप्परने पोलिस कर्मचा-यास चिरडल्याची घटना आज दि.२९ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता दरम्यान माटरगाव नजीक घडली. या घटनेत पोलिस कर्मचा-याचा जागीच मृत्यु झाला असून या घटनेमुळे जिल्ह्याच एकच खळबळ उडाली आहे.
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा पाठलाग करून त्याला अडवणाऱ्या पोलिसाला टिप्पर चालकाने धडक देऊन पोलिसाला चिरडल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यात घडली . घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहचले होते .
याप्रकरणी टिप्पर सह मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सर्वत्र लोकडाऊन ची स्थिती असतांनाही बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आला आहे . यामध्ये पूर्णा नदीला असलेल्या गावांजवळ अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करीत आहेत . यामध्ये 29 एप्रिल रोजी पहाटे शेगांव तालुक्यातील माटरगाव , भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर एक विना नंबरचे टिप्पर रेती घेऊन खामगाव शहराकडे जात असल्याची माहिती जलंब पोलीस स्टेशन चे कॉन्स्टेबल उमेश शिरसाट यांना मिळाल्यावरून त्यांनी एका होमगार्ड ला सोबत घेऊन मोटारसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला . सदर टिप्पर हा माटरगाव या गावाच्या पुठे पोहचलेला असतांना पोलिसाने मोटारसायकल टिप्पर पुठे आडवी करून वाहन थांबविले दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुठे नेले . याप्रकरणी टिप्पर चालक विशाल गवळी रा . कठोरा , टिप्पर मालक भरत सुधाकर मिरगे यांच्यासह पाच जणांविरुद्ध जलंब पोलिसांनी कलम 302 , 353 , 143 , 109 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .