Home ताज्या बातम्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने सोहळा साजरा  

नांदेड, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या  60व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण आज संपन्न झाला. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.