Home शहरे औरंगाबाद मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद कोरोनाचा हॉस्पॉट होण्याची चिन्हे

मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद कोरोनाचा हॉस्पॉट होण्याची चिन्हे

औरंगाबाद : राज्यात विषाणूने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ आता औरंगाबाद कोरोनाचा हॉस्पॉट होण्याची चिन्हे आहेत. शनिवारी औरंगाबादेत २३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यामध्ये नूर कॉलनी ५, बायजीपुरा ११, कैलास नगर ३, समता नगर २, जयभीम नगर १ येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २१६ वर पोहचला आहे.

तर शुक्रवारी शहरात ३९ नवीन रुग्ण आढळून आले होते, तसेच ७६ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. आज सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तो भाग प्रशासनातर्फे सील करण्यात आला आहे.

शुक्रवारी आढळून आलेल्या या ३२ रुग्णांमध्ये मुकुंदवाडीमध्ये १८, नूर कॉलनीमध्ये ३, वडगावमध्ये १, आसेफीया कॉलनीमध्ये 3, भडकल गेट परिसरात १, गुलाबवाडी पदमपुरा २, सीटी चौक, मेहमुदपुरा १ आणि भीमनगरमध्ये २ रुग्ण आढळले होते. ४७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यूगुरूदत्त नगर येथील ४७ वर्षीयरुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला २७ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी ६.वाजेदम्यान मृत्यू झाला आहे.