Home बातम्या आंतरराष्ट्रीय हंदवाडामध्ये दोन दहशतवादी ठार, चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद

हंदवाडामध्ये दोन दहशतवादी ठार, चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथे सैन्य आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. सैन्याने येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईत दोन सैन्य अधिकाऱ्यांसह 5 सैनिक शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये एक कर्नल, एक प्रमुख, लष्कराचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सब-इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे.

या कारवाईत 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाल्याचे वृत्त आहे. कर्नल आशुतोष अनेक यशस्वी ऑपरेशन्समध्ये सहभागी झालेले होते. दरम्यान शनिवारपासून ही चकमक सुरु आहे. येथे गोळीबार थांबला आहे, परंतु लष्कराचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

चकमकीपूर्वी येथे दोन विदेशी दहशतवादी एका घरात लपलेले होते. सैन्याला याची माहिती मिळाली. सैन्याने दहशतवाद्यांच्या या ठिकाणालाच स्फोट करुन उडवून दिले. स्फोटामुळे संपूर्ण घराला आग लागली. सैन्य आता या घरातील ठिगाऱ्याची तलाशी घेत आहेत.

दरम्यान लष्कराची शोधमोहिम अजूनही सुरूच आहे. या व्यतिरिक्त लष्कराकडूनही या भागात शोध मोहीम सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत या परिसरात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तान नियंत्रण रेषेत सतत युद्धबंदीचे उल्लंघन केले जात आहे.