Home ताज्या बातम्या देहूरोड कॅण्टोन्मेण्ट व पोलीस स्टेशनला पन्नास लाखांच्या आमदार निधीतून ,औषधे व साहित्य वाटप

देहूरोड कॅण्टोन्मेण्ट व पोलीस स्टेशनला पन्नास लाखांच्या आमदार निधीतून ,औषधे व साहित्य वाटप

मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांचा उपक्रम

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) रमेश कांबळे
मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी आपल्या पन्नास लाख रुपयांच्या आमदार निधीतून देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात सोडिअम हायपोक्लोराईड, थरमल गण, एन-९५ मास्क , पीपीइ किट, हॅन्ड सॅनिटायझर, ट्रिपल लेअर मास्क आणि व्हीटीएम किट, अशा साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ,देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड कार्यालयात सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, नगरसेवक हजीमलंग मारीमुत्तु , गोपाळ तंतरपाळे, ऍड.अरुणा पिंजण , देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष कृष्णा दाभोळे, ऍड. प्रवीण झेंडे , शिवसेना देहूरोड शहर अध्यक्ष भरत नायडू , भाजपचे बाळासाहेब काळोखे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंबहुना या विषाणूचा मावळ तालुक्यात शिरकावच होऊ नये ,यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी सर्व त्या उपाय योजना राबविल्या आहेत. संपूर्ण मावळातील गोरगरीब ,मोलमजुरी करणारे ,मजूर आशा गरववंतांना ,शिधा किटचे वाटप , आदिवासी भागातील नागरिकांना ,पाण्या पासून ते अन्नधान्य पुरवठा , करून या कोरोना सारख्या महामारीच्या संकटा विरुद्ध लढण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केले. मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , सर्व पोलीस ठाणे यांना आमदार निधीतून ५० लाख रुपयांची औषध व पूरक साहित्याचे वाटप केले.
कोरोना सारख्या महामारीच्या संकटात आमदार सुनील शेळके हे स्वता सर्वत्र फिरून आढावा घेऊन त्यावर उपाय योजना करीत आहेत. मतदार हेच आपले मायबाप समजून ते अहोरात्र कष्ट घेताना दिसून येत आहे . हे साहित्य वाटप करण्याचे सर्व नियोजन ,आमदार सुनील शेळके यांचे खंदे समर्थक अतुल मराठे आणि कार्यकर्ते करीत आहेत .