Home शहरे सातारा 150 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह,143 जणांना विलगीकरण कक्षात दाखल

150 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह,143 जणांना विलगीकरण कक्षात दाखल

सातारा -जिल्ह्यातील 150 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर विविध विलगीकरण कक्षात 143 जणांना दाखल करण्यात आले आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 50, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 77, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 2 , वाईच्याग्रामीण रुग्णालयातील 7, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील 15 असे एकूण 150 जणांचे अहवाल निगेटिवह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 25, कराडच्या कृष्णा हॉंस्पिटलमध्ये 7 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 94 अशा एकूण 143 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.