Home शहरे अहमदनगर जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस

जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस

नगर -नगर शहर परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा निर्माण झाला होता. त्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने नगरकरांना उकाड्याने चांगलेच हैराण केले होते. नगर शहरासह पारनेर, अकोले या तालुक्‍यात त्याच दरम्यान अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचा दाणादाण उडाली होती. शहरात या वादळी पावसामुळे काही भागात झाडे उन्मळून पडले होते.

अकोले, पारनेर आदी तालुक्‍यातही वादळी पाऊस झाला. फळबागांना या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हा पाऊस अर्धा ते पाऊस तास सुरू होता. शहरात झालेल्या या पावसाने रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले होते. अकोले, पारनेर, जामखेड आदी तालुक्‍यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्‍यातील निंबळक, टाकळी खातगाव, एमआयडीसी आदी भागातही जोरदार पाऊस झाला.