Home ताज्या बातम्या मान्सून 4 दिवस लांबणीवर, केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 जूनला मान्सून बरसणार !

मान्सून 4 दिवस लांबणीवर, केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 जूनला मान्सून बरसणार !

नवी दिल्ली : हवामान खात्याने यंदाचा मान्सून ४ दिवस उशिराने केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यंदा केरळमध्ये 1 जून ऐवजी 5 जूनला मान्सून दाखल होणार आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून उशीराचं बरसणार आहे. त्यामुळे याचा फटका शेतीच्या कामांवर होणार असल्याचं दिसत आहे.

मागच्या वर्षी केरळमध्ये 6 जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज होता मात्र 8 जूनपर्यंत 2 दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं.पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झाले आहेत.

दरम्यान उकाड्यानं हैराण झालेले नागरिक आणि बळीराजा भाताच्या पेरणीसाठी मान्सूनची आतूरतेनं वाट पाहात असतो. मान्सून वेळत आला तर शेतीची कामं योग्य मार्गी लागतात. मान्सून येण्यास विलंब झाला तर पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. जून ते सप्टेंबर या कालावधित चांगला पाऊस होणं हे पाणी शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. दक्षिण भारतातून मान्सून उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून 4 दिवस उशिरानं येणार आहे.