Home गुन्हा लॉकडाऊन काळात प्रतिबंधित क्षेत्रात बंदी असताना तंबाखू विक्री करणाऱ्या जेरबंद

लॉकडाऊन काळात प्रतिबंधित क्षेत्रात बंदी असताना तंबाखू विक्री करणाऱ्या जेरबंद

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख दि. १५ मे  : लॉकडाऊन काळात प्रतिबंधित क्षेत्रात बंदी असताना तंबाखू विक्री करणाऱ्या गुन्हेगारास पोलीस सह आयुक्त आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले आहे.

मिळालेली माहिती, १५ मे रोजी पथकाचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना पथकातील कर्मचारी संदिप साबळे यांना बातमी मिळाली की, रानडे कॉलनी, कोंढवा बुद्रुक येथे एक व्यापारी तंबाखू विक्री करीत आहे. त्यानुसार रानडे कॉलनी, सोमाजी गाव कोंढवा बुद्रुक येथे छापा टाकून अशोककुमार यादव (वय ४५, रा. सदर, मूळगांव गाजीपुर जिल्हा,उत्तर प्रदेश) याच्याकडून चुविंग तंबाखूच्या पुड्या व ४० किलो सुटी तंबाखू असा एकूण १४,१७०/- रु.चा माल जप्त केला आहे. प्रतिबंधित क्षेत्रात तंबाखू व्यापार करणं मनाई असून, ती आरोग्यास अपायकारक आहे, हे माहीत असतानाही आरोपी तंबाखूचा व्यापार करीत होता. आरोपीला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिले असून, तेथे गुन्हा दाखल केला आहे. तसेच १४ मे रोजी रेहाना पान शॉप, क्रांती चौक, बुधवार पेठ येथे छापा टाकून सिराजुद्दीन सैय्यद (वय ४०, रा. बुधवार पेठ) व शंकरअप्पा माशाळा (वय ३३, रा. सदर) यांच्या ताब्यातून २३,४८५/-रु.चा माल वेगवेगळ्याकंपनीच्या सिगरेट्स जप्त केल्या आहेत. सर्व इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक फौजदार प्रसाद मोकाशी, हवालदार उदय काळभोर, नाईक संदीप साबळे, अमोल पिलाणे यांनी केली आहे.