Home ताज्या बातम्या उत्तर प्रदेश गंभीर आघात 24 ठार, 35 जखमी,15 गंभीर

उत्तर प्रदेश गंभीर आघात 24 ठार, 35 जखमी,15 गंभीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील औरैया गावाजवळ एका मोठा अपघात घडला आहे. महामार्गावरील  एका चहाच्या दुकानासमोर थांबलेल्या ट्रॉलरला दुसर्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २४ मजूरांचा जागीच मृत्यु झाला. ३५ जण जखमी झाले असून त्यातील १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मजूर राजस्थानहून बिहार, झारखंड, पश्चिम बंगालकडे जात होते. ट्रकमध्ये चुना भरलेला होता. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.