Home ताज्या बातम्या कंटेन्मेंट झोन मध्ये बिबवेवाडीत ९५० रुग्णांची तपासणी

कंटेन्मेंट झोन मध्ये बिबवेवाडीत ९५० रुग्णांची तपासणी

 राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियान

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानातील दुसऱ्या दिवशी बिबवेवाडी  कंटेन्मेंट झोन मध्ये शिबीर  शनीवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत पार पडले.राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
 शिबिरासाठी डॉ. पी.आर.बियाणी, डॉ. मनोहर जाधव, डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी बिबवेवाडी सुपर इंदिरानगर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये तसेच डॉ. मयुरा टेकवडे, डॉ. अनुपमा गायकवाड, डॉ. प्राजक्ता जाधव या महिला डॉक्टरांनी व डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. सुनिल धुमाळ, डॉ. संदीप बोरकर, डॉ. सचिन ढमाले यांनी महेश सांस्कृतिक भवन ,अप्पर इंदिरा नगर येथे दोन अँबुलन्स, ४ थर्मल गन्स् , पीपीई किटस्, फेस शिल्ड घालून एकूण ९५० रुग्णांची तपासणी केली. 
राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या  मार्गदर्शनाखाली संयोजन डॉ. हेमंत तुसे, डॉ. शशिकांत कदम, डॉ. तुषार वाघ व तसेच  गणेश मोहिते( पुणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), सुहास उभे,  रोहन पायगुडे( पुणे शहर रा.कॉ. युवक सरचिटणीस) यांनी सुद्धा औषध वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझेशन आदी सर्व निकष रुग्णांद्वारे पालन करवून घेऊन अत्यंत शिस्तबद्ध रीतीने दोन्ही ठिकाणच्या शिबिरांचे नियोजन केले.
 ‘डॉक्टर्स आपल्या दारी’ हे अभियान शुक्रवारी सुरु झाले . या द्वारे पुणे शहराच्या कंटेनमेंट वैद्यकीय मदत शिबिरे आयोजित केली जात आहेत.
  शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पबचत भवन येथे अभियानाचा अनौपचारिक प्रारंभ केला. या अभियानात एकूण १५० डॉक्टर्स मंडळींनी सहभाग नोंदविल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी दिली.एक महिना हे अभियान चालणार आहे. 
पहिल्या दिवशी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी अभियान भवानी पेठ भागात लोहियानगर,फायर ब्रिगेड जवळ तसेच सावधान मंडळ(गंजपेठ,चंदन स्वीटमार्ट जवळ)येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत घेण्यात आले. २रुग्ण वाहिकांसह १५ डॉक्टर्स सहभागी झाले.७८५ जणांची तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आले.डॉ राजेश पवार , डॉ संगीता खेनट, डॉ नरेंद्र खेनट, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ तुषार वाघ, डॉ.सिद्धार्थ जाधव, डॉ. मोहन ओसवाल, डॉ नितीन पाटील, डॉ सचिन लोंढे, डॉ कपिल जगताप आदींनी सहभाग घेतला. 
चेतन तुपे, विनायक हनमघर, गणेश नलावडे, बाबा धुमाळ, सुहास ऊभे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या.