Home ताज्या बातम्या दिल्लीहून विशेष रेल्वेने उद्या पुण्यात विद्यार्थी परतणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

दिल्लीहून विशेष रेल्वेने उद्या पुण्यात विद्यार्थी परतणार -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : दिल्लीहून विशेष रेल्वेने दि. १६ मे रोजी निघालेले महाराष्ट्रातील 1 हजार 345 विद्यार्थी उद्या परतणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील 160 विद्यार्थी याठिकाणी पोहोचत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

ही रेल्वे आज रात्री 9 वाजता पुणे रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्म क्रमांक 6 वर येईल. विद्यार्थ्यांंची स्क्रिनींग करून ( अहमदनगर रस्त्यावरील ) एक्झिट गेटने बाहेर पाठविण्यात येणार आहे.
( संपर्क-

Natekar Amrut
Mobile:+919422616033
Mobile:+919834468894

महाराष्ट्रातील एकूण 1345 विद्यार्थी दिल्लीहून परतत असून भुसावळ, नाशिक, कल्याण व पुणे रेल्वे स्थानकावर हे विद्यार्थी उतरणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर 489 विद्यार्थी उतरणार असून यापैकी
पुणे जिल्ह्यातील- 160 विद्यार्थी,
सातारा जिल्ह्यातील- 57
सांगली-40
कोल्हापूर- 60
लातूर- 62
उस्मानाबाद-32
सोलापूर-68
सिंधुदुर्ग-2
रत्नागिरी जिल्ह्यातील -8
विद्यार्थी या विशेष रेल्वेने येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.