Home गुन्हा तडीपार असूनही ,पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या , सुविख्यात गुंड महाकाली याच्या भावाचा खून

तडीपार असूनही ,पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या , सुविख्यात गुंड महाकाली याच्या भावाचा खून

पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी ) रमेश कांबळे

दारू पित असताना ,झालेल्या हमरीतुमरीतुन ,डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली घडली.

मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद दकोलिया (वय ३५, रा. रमाबाई नगर, रावेत, पुणे) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी आदम उर्फ गोट्या महमद खान (वय ३२ वर्षे रा. स्मशान भूमीजवळ, पूनावळे) या संशयिताला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगऱ्या उर्फ मनोज ढकोलियाआणि आदम उर्फ गोट्या महंमद खान हे दोघेजण हे दारू पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते.कोणत्या तरी अज्ञात कारणावरून दारू पित असताना त्यांच्यात शाब्दिक भांडण झाले. यावेळी आदम खान याने लाकडी दांडक्याने ,डिंगऱ्याच्या डोक्यात मारहाण केली. त्यानंतर आदम याने घटनास्थळावरून पलायान केले . याबाबतची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिंगऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कुख्यात गुंड महाकाली याचा एन्काऊंटर झाला . त्यामुळे देहूरोड निगडी ,विकासनगर ,आणि पिंपरी चिंचवड च्या काही भागात गुन्हेगारी कमी झाली होती . म महाकालीचा एन्काऊंटर झाल्या नंतर गुन्हेगारी जगताला हादरा बसला होता . परंतु काही दिवसानंतर त्याचा भाऊ डिंगऱ्या याने डोके वर काढले ,आणि आपली एक तयार करून गँग चालविण्याचा प्रयत्न करू लागला होता . मात्र त्यात त्याला आपयश आले . लूटमार करणे आदी गुन्ह्यासह डिंगऱ्यावर विविध पोलीस ठाण्यात नऊ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे .त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांची नजर चुकवून वावरत होता.रावण टोळीच्या मोहरक्यांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या अवळल्याने , डिंगऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली होती.