Home ताज्या बातम्या पुणे कॅन्टोन्मेंट शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन

पुणे कॅन्टोन्मेंट शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन

पुणे:करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पुणे कॅटोंन्मेंट बोर्डाने 22 मे पर्यंत दिवस पूर्णत: लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत बोर्डाच्या हद्दीतील केवळ दूधविक्री आणि औषधांची दुकाने खुली राहणार असल्याची माहिती बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कॅटोंन्मेंट हद्दीतील घोरपडी, मोदीखाना, फामिमानगर, सोलापूर बाजार, दस्तूर मेहर रस्ता आणि भीमपुरा या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे आहेत. याच पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बोर्डातर्फे दि.19 मे ते 22 मेदरम्यान कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औषधांच्या दुकानांसाठी सकाळी 10 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 8 तर दूधविक्रीसाठी सकाळी 7 ते 10 अशी वेळ ठरविण्यात आली आहे. तर भाजीविक्रीसाठी सकाळी 6 ते 10 ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.