Home ताज्या बातम्या प्रधान सचिवांनी स्वॉब केंद्रासह प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

प्रधान सचिवांनी स्वॉब केंद्रासह प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

0

दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख

प्रधान सचिवांनी स्वॉब केंद्रासह प्रतिबंधित क्षेत्राची केली पाहणी

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्वॉब सेंटर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील स्वॉब सेंटरला भेट दिली.
स्वॉब सेंटर मधील नागरिकांची नोंदणी, स्वॉब कक्ष, विलगीकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांकरिता करण्यात आलेली सुविधा व भोजन सुविधा याबाबतची माहिती घेतली. येथील एकूणच करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वॉब सेंटरनंतर चुडामन तालीम, जुना मोटर स्टँड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेला बंदिस्त भाग, अडथळे, पत्र्याने बंदिस्त केलेल्या भागाची पाहणी केली.
पाहणी प्रसंगी त्यांनी येथील परिस्थितीबाबत सभासद अविनाश बागवे, रफिक शेख, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त माधव देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश दिघे, डॉ. अब्दुल सलाम सुतार, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव, उपायुक्त माधव जगताप व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मंजुळाबाई चाळीस भेट
या परिसरातील मंजुळाबाई चाळीत संशयित व बाधित रुग्ण आढळल्यामुळे या चाळीस भेट देण्यात आली.
याप्रसंगी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह अन्य अधिकारी व नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सविस्तर चर्चा केली.
येथील सुविधांबाबत येथील नागरिक व चाळीचे सचिव यांच्याशीही चर्चा केली.
याप्रसंगी सहपोलिस आयुक्त डॉ. संजीव शिंदे, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वप्ना गोरे, सह महापालिका आयुक्त विजय दहीभाते, क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे, व अन्य अधिकारी उपस्थित होते.

पाटील इस्टेट परिसराची पाहणी
पाटील इस्टेट परिसराची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली.
या परिसरात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॉब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, क्विक रिस्पॉन्स टीम कामकाज, काँटॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरुपाच्या करण्यात आलेल्या कामकाजाविषयी माहिती त्यांनी घेतली.
परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,संतोष मुळे, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालिनी कोलते, उपायुक्त नितीन उदास, क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे, विभागीय आरोग्य निरीक्षक आय येस इनामदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.

coronavirus CoronaPune