Home ताज्या बातम्या मुगावडे येथील दारूभट्टी पौड पोलीसांकडून पुन्हा उद्ध्वस्त

मुगावडे येथील दारूभट्टी पौड पोलीसांकडून पुन्हा उद्ध्वस्त

0

मुगावडे येथील दारूभट्टी पौड पोलीसांकडून पुन्हा उद्ध्वस्त

परवेज शेखपौड  :  मुगावडे, ता.मुळशी हद्दीतील हातभट्टी पौड पोलीसांनी आज पुन्हा उद्ध्वस्त केली आहे. एकुण 61 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला आहे. मागील काही दिवसात पौड पोलीसांनी दारूभट्टी उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला असून मुळशीकरांकडूनही त्याचे स्वागत होत आहे. मुगावडे येथे वारंवार कारवाई करूनही पुनः पुन्हा हातभट्टी तयार केली जात आहे, ही मात्र चिंतेची बाब आहे

             मुगावडे गावच्या हद्दीत मुळा नदी किनारी हातभट्टीची दारू तयार करण्यात येत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना ही बाब समजताच त्यांनी कारवाईसाठी सदर ठिकाणी पथक पाठवले. यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक नितीन गार्डी, पोलीस शिपाई मयुर निंबाळकर, सुहास सातपुते, गणेश साळुंखे व गावचे पोलीस पाटील वाकणकर यांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी येथील नंदू काळुराम बिरे हा आरोपी पोलीसांचा मागोवा लागताच पळून गेला.

             सदर ठिकाणी पोलिसां 5 हजार लिटरच्या दोन लोखंडी टाक्या व त्यामध्ये 6 हजार लिटर रसायन तसेच 35 लिटर तयार दारू असे एकूण सुमारे 61 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. हा मुद्देमाल सँपल काढून घेऊन जागीच नष्ट करण्यात आला आहे. सदर छाप्याची कारवाई केल्या नंतर वरील आरोपीवर पौड पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक देवकाते हे पुढील तपास करीत आहेत.

             मागील काही दिवसापुर्वी येथे पोलीसांनी छापा टाकून ही भट्टी उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर 12 दिवसातच उत्पादन शुल्क विभागानेही परत याच ठिकाणी कारवाई केली होती. आणि आता परत त्याच ठिकाणी पौड पोलीसांना पुन्हा कारवाई करावी लागत असल्याने या हातभट्टी दारू तयार करणाराची मोठी हिम्मत असल्याचे दिसून येत आहे. याच्यावर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.