Home ताज्या बातम्या पी-४ फाऊंडेशन ही कोरोना विरुद्ध सर्वसमावेशक योद्धा म्हणून लढली

पी-४ फाऊंडेशन ही कोरोना विरुद्ध सर्वसमावेशक योद्धा म्हणून लढली

पुणे प्रतिनिधी:-

कोरोनाची काळोखी रात्रं संपत नाहीये..पण या अंधार्या रात्रीतून चालताना माणुसकीचं..सेवेचं..कर्तव्याचं…निष्ठेचं चांदणं सोबत आहे.. पुण्यातून बाहेर जाणार्‍या जवळ जवळ लाखो मजुरांसाठी ट्रेन-बस सुरू करण्यात आल्या आहेत..सध्याच्या काळात सगळ्यात अडचणीत असलेला वर्ग म्हणजे हातावर पोट असणारा हा मजूर वर्ग.. लॉक डाऊनच्या कालावधीत हातावर पोट असलेल्यांचे, मजुरांचे, कष्टकरी कामगारांचे, गरीबांचे, बेघरांचे, निराधारांचे, स्तलांतरीत जनतेचे, वाटसरुंचे अतोनात हाल होत होते. पोटाची खळगी भरण्यासाठी सैरावैर झालेले अनेक कुटुंबाना आधार देण्यासाठी गरजूं व्यक्तींना मदत करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पी-४ च्या समन्वयकांनी (एस पी ओ) आणि माणुसकीच्या नात्याला प्रत्येक जण सर्वसमावेशक स्वरुपात मदत करताना दिसून आले.

अशा स्थितीतही न डगमगता आपल्या कर्तव्याच्या पुढे एक पाऊल उचलून या स्थलांतरित होणार्‍या आमच्या मजुरांचं व त्यांच्या कुटुंबियांचे दुःख कणभर तरी कमी व्हावे आणि त्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अन्नधन्याचे कीट वाटपाचा हा यशस्वी उपक्रम केला. हातात काम नाही..रहायला घर नाही..पैसे संपून गेलेले..कोरोनाचं संकट..सोबत छोटी मुलं..अशा खचलेल्या मानसिकतेत हजारो मजुरांनी मिळेल त्या साधनाने आपापल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे..त्यांना सर्वोपरी मदत म्हणून प्रशासनाकडून या सगळ्या मजुरांसाठी विविध सुरू करण्यात आले आहेत..प्रतिकूल परिस्थितीत प्रवास करणार्‍या या मजुरांसाठी पुणे पोलिस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि काही संस्था यांच्या मदतीने या प्रवास करणाऱ्यांसाठी पाण्याच्या बाटल्या, पाकिंग जेवण,फळं, दूध अशा सामानाचं वाटप सुरू आहे. पोलिस अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक टीम दैनंदिन प्रशासकीय कामकाज सांभाळून मानवतेच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत हे कर्तव्य करत आहेत.

पुणे शहरात राहणार्‍या पोलिस अधिकाऱ्यांच्या समवेत एकत्र येऊन या वस्तूंसाठी मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.. यात पोलीस प्रायव्हेट सेक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम (पी-४) यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पी-४ फाऊंडेशन पुणे यांच्या मार्फत ही मदत दिली जात आहे. प्रवास करणार्‍या गर्भवती माता, लहान बाळं..छोटी मुलं..वयोवृद्ध व्यक्ती यांचा खास विचार करून पाकिंग अन्नपदार्थ आवर्जून देत आहेत जे प्रवासातही वापरता येईल.. तसेच या दूर पल्ल्याच्या प्रवासात सुरक्षा साधने हि देण्यात आली आहे…आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येने गरजूंना मदत देण्यात आली आहे..आणि यानंतर जाणार्‍या लोकांपर्यंत मदत देणार आहेत.

पोलिस कर्मचारी यांना मदत म्हणून पी-४ समन्वयक टीम कडून फॉर्म भरणे, तपासणे, कॉल करून सूचना देणे, मजुरांच्या रांगा लावणे, त्यात त्यांना अन्नदान-पाणी-फळे वाटप करून बसेस मध्ये बसवण्यापर्यंतचे सर्व काम त्यात हद्दील पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करतात. रेल्वे स्टेशनवर जाऊन या सगळ्या सामानाचं वाटप करत आहेत.आलेले सामान उतरवून घेणे..ते त्या त्या गेट वर मांडून घेणे..त्याचे शिस्तीत रोज हजारो प्रवाशांना वाटप करणे..यासाठी ट्रेन सुटण्याच्या आधी रणरणत्या उन्हात दिवसभर तयारी करणे..ही सगळी कामं पोलिस कर्मचारी व सर्व समन्वयक स्वेच्छेने माणुसकीच्या भावनेतून करत आहेत..
तसेच आपत्ती व्यवस्थापन, विशेष सुरक्षा पुरविण्याच्या कामी, शांततेचा भंग करणारे टोळके, अवैद्यरित्या चालणारी स्वच्छताविषयक द्रव्य व्यापार, भुरट्या चोऱ्या, घरफोडी, वाहनचोरी, संशयित व्यक्ती किंवा वस्तूंची माहिती, गुन्ह्यांबाबतची माहिती, पेट्रोलिंग दरम्यानची माहिती,वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षा कर्मचार्यांना कर्तव्यावर आहे कारण अनेक जण इतरत अडकल्याने तसेच अचानक गावी गेल्याने पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली त्यात या कामाला हातभार लावला.

आपण सगळेच वैयक्तिक पातळीवर अनेक ठिकाणी मदत करत असतो..तसेच अनेक स्वयंसेवी संस्था खूप मोठी कामं या काळात करत आहेत..पण पोलिस सध्या ज्या मनस्थितीमध्ये आणि ज्या परिस्थितीमध्ये त्याचा विचार त्यांच्या सोबत कर्तव्य करताना जाणवला आहे. त्यामुळे आपला काहीतरी खारीचा वाटा असला पाहिजे म्हणून मार्च महिन्यात लॉक डाउन सुरू झाल्यापासून एकही दिवस सुट्टी न घेता रात्रंदिवस त्यांचं काम सुरू आहे. सतत सुरू असलेल्या कामाचा प्रशासनावरील प्रचंड ताण..दिवसरात्र होरपळून काढणार्‍या उन्हात संचारबंदीची कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीत मदतनीस (एस पी ओ) म्हणून कर्तव्य केले आहे …. कोरोनाच्या इन्फेक्शनची सतत भीती….कसलाही आरोग्य विमा नाही तरीही पोलीस बांधवांचे व सहकाऱ्यांचे होत असलेले मृत्यू अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांच्या पाठीसी खंबीरपणे उभे राहणे कर्तव्य मानले आहे..सामान्य माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने विनामोबदला कर्तव्य सामूहिकरीत्या करत आहेत.. या उलट आतापर्यंत ५०००० पाणी बॉटल्स,१५,००० मास्क, ५००० सेनीटायझर बॉटल्स, ३००० पाकिंग फूड, ५०० पी.पी.ई किट, १० इन्फ्रारेड डीजीटल थर्मामीटर, शेकडो पोलिसांना बंदोबस्तात मनुष्यबळासह चेक पोस्ट वर मदत, ज्या ज्या पोलीस बांधवांनी आपली कुटुंब आणि लहान मुलं त्यांना स्वतः पासून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी गावाकडे पाठवून दिली आहेत त्यांना जेवणाच्या डब्यांची सोय केली.


त्यात राज्यात हजारपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. तसेच अनेक पोलिसांनी आपले प्राणही गमावले आहेत म्हणून पी-४ पोलिसांची व गरजूंची शक्य होईल तेवढी मदत करीत आहे..

कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे; आणि सुरक्षेच्या कारणास्तव गाव खेडी अजूनही बंद आहे. पुणे जिल्ह्यातील जवळपासच्या काही गावात जाऊन लाखो रुपये खर्च करून भाजीपाला वाटप मोहीम हाती घेतली आहे. या मदतीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे वाटपाबरोबरच विविध मदतकार्यामुळे सध्याच्या परिस्थिती मध्ये खूप मोठा दिलासा पोलीस प्रशासनाला मिळाल्याचे दिसून आले त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी पी-४ फाऊंडेशन मधील समन्वयकांचे विशेष आभार मानले आहे.