Home गुन्हा पूर्ववैमानस्यातून घातक शस्राने वार करून तरुण उद्योजकाचा खून, सात आरोपींना वडगाव मावळच्या पोलिसांकडून अटक

पूर्ववैमानस्यातून घातक शस्राने वार करून तरुण उद्योजकाचा खून, सात आरोपींना वडगाव मावळच्या पोलिसांकडून अटक

पिंपरी चिंचवड( प्रतिनिधी) रमेश कांबळे
शुक्रवार (ता.२१ ) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास , सात ते आठ जणांच्या टोळक्याने मित्रांच्या सोबत फिरण्यासाठी गेलेल्या ,यश रोहिदास आसवले,वय २२ ( रा.टाकावे बुद्रुक ,ता मावळ ,जि.पुणे ) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून खून केला. ही घटनेची माहीत वडगाव मावळ पोलिसांना कळाली. पोलिसांनी घायनास्थळी धाव घेतली .या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके पाठविण्यात आली. त्यांना मिळालेल्या महितीनुस्वार पोलिसांनी वडगाव येथील डेक्कन हिल्सजवळ असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ सापळा रचला ,आणि त्या ठिकाणी लपून बसलेल्या सात संशयितांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ,यश आसवले याचा खून केला असल्याची कबुली दिली.आणि अवघ्या सहा तासात वडगाव मावळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावून ,सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
हृतिक बाळू आसवले वय- २० ( रा.टाकावे बुद्रुक मावळ) अजय बबन जाधव वय-२४( रा.टाकावे ) अतिष राजू लंके वय- २१( रा.यवतनगर तळेगाव दाभाडे ) विकास उर्फ बाप्पू विष्णू रिठे वय-२३( रा.गुरुदत्त कॉलनी तळेगाव दाभाडे ) हृतिक कांताराम चव्हाण वय- १९( म्हाळसकरवाडा वडगाव )अश्विन कैलास चोरघे वय २२( रा.घोणशेत ता.मावळ) आणि निखिल भाऊ काजळे वय-२०(रा.म्हाळसकरवाडा ,वडगाव मावळ) अशी अटक आरोपितांची नवे आहेत.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत् टाकावे बुद्रुक घोणशेत रोडवर टाकावे गावापासून एक किमी अंतरावर हा प्रकार शुक्रवारी रात्री यश रोहिदास आसवले वय-२२,महेंद्र अरुण आसवले वय-३५आणि निखिल सोपान भांगरे वय-३० हे तिघे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फिरायला गेले होते.
त्यावेळी त्याच्या पाठीमाघून टाकावे बाजूने तीन मोटार सायकलवरून सात आठ अनोळखी व्यक्ती बेकायदेशीरपणे जमाव करून आले.त्यातील चौघे गाडीवरून खाली उतरले .आणि काही समजण्याच्या आतच कोणत्या तरी धारदार हत्याराने रोहिदास आसवले याच्या डोक्यात वार करून ,त्यास गंभिररित्या जखमी करून खून करण्यात आला असल्याचे महेंद्र अरुण आसवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.वडगाव मावळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्या पासून घुन्हा उघडकीस आणून अवघ्या सहा तासात सर्व गुन्हेगारांना जेरबंद केले.
वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे ,यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप देसाई ,महिला पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, सहायक फोउजदार विश्वास आंबेकर , कविराज पाटोळे ,भाऊसाहेब कर्डीले , पोलीस नाईक गणेश तावरे ,रवींद्र रॉय, दिलीप सुपे मनोज कदम , पोलीस कॅन्सटेबल दीपक गायकवाड , प्रवीण विरणक , आदी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.