Home ताज्या बातम्या गणेश शंकर माळी, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष अखंडपणे सेवाकार्य करणारा योद्धा

गणेश शंकर माळी, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष अखंडपणे सेवाकार्य करणारा योद्धा

0

मागील दोन महिन्यापासून कोरोना काळात पुणे शहरात एक योद्धा अखंड मदत करत आहे. त्याच्या कार्याला लाख मोलाचा सलाम. ना कुठे बातमी,ना कुठे गाजावाजा अखंडपणे सेवाकार्य करणारा योद्धा म्हणजे गणेश शंकर माळी, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष.

पुणे शहरात कोरोनाचा पहिला पेशंट सापडला आणि कोरोना महामारी सुरू झाली. पुणे शहर व संपुर्ण महाराष्ट्र अचानक लाॅकडाऊन झाला, सर्वच स्तरावरच्या लोकांना घरात बंदीस्त व्हायला लागले. श्रीमंत, मध्यमवर्गीयांचे बरे होते पण यात प्रामुख्याने भरडला तो मजूर, कामगार वर्ग, हातावरचे पोट असणारे लहान-सहान नोकरी करणारे, बाहेर गावाहून, जिल्हा व राज्यातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी खानावळी, हाॅटेल लहान-मोठे स्टाॅल, हातगाडी कोरोनामुळे सर्व बंद झाले आणि यांच्यावर उपासमारीची वेळ आली. अशीच उपासमारीची वेळ रोज कमवून खाणारे तृतीयपंथी वर्ग यांच्यावरही आली. त्यांच्या चुली बंद झाल्या शासन कधी मदत देईल ते माहीत नव्हते, या काळात मदतीस धावून आले ते गणेश शंकर माळी, संवेदना फौंडेशन आणि त्यांचा मित्र परिवार. हे सर्वजण शिव- शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे फाउंडेशनचे नाव ‘संवेदना फौंडेशन’ तसेच संवेदनशीलपणे वागणारे शिलेदार यांनी अखंड, खंबीरपणे सतत दोन महिने संपुर्ण महिन्याचा किराणा शासनाचे सर्व नियम,अटी पाळून सुरक्षितपणे 250 ते 300 कुटूंबाना घरपोच केला तसेच या अवघड कोरोना काळात 150 ते 200 लोकांना रक्तदान करण्यास प्रवृत केले.

रक्तदान करून घेतले, पक्षांना पाणी-धान्य या काळात वेळोवेळी दिले. कोरोना काळामध्ये मेडीकल व्यवस्था नसणारे आजारी लोकांना दवाखान्यात पोचवायची जबाबदारी पार पाडली, शासनाचे नियम पाळून कोरोना काळात अडकलेल्या लोकांना घरी पोचवायची व्यवस्था केली. गणेश माळी व त्यांचे सहकाऱ्यांच्या मदतीने शासनाचे सर्व नियम पाळून मदत केली. पुणे शहरात जर कुणाचा किराणा संपला आणि पैसेही नाहीत असे लोकं गणेश माळी यांच्यापर्यंत मदत मिळावी म्हणून पोचले तर पुणे शहराच्या बाहेर सुद्धा संवेदना फौंडेशन व मित्र, सहकारी यांच्यामार्फत मदत पोचवली. शासन करेल आपल्याला काय करायचे असा विचार न करता कोणी उपाशी झोपू नका, फुल ना फुलाची पाकळी मदतरूपी तुमच्यापर्यंत पोचवू. अडचणीच्या वेळी संपर्क करा, असा मेसेज आणि त्यात फोन नंबर देवून मेसेज व्हायरल केला आणि त्याचेच रुपांतर अनेक कुटूंबाची या देवदुताने चुल चालू ठेवली. एका बाजूला मदत पोचती करणे सुरू होते आणि दुसऱ्या बाजूस जेव्हा पोलिसांवरचा भार वाढला तेव्हा पोलिसांच्या मार्फत ‘कोविड फायटर’ म्हणून रस्त्यावर उतरून कोरोना वातावरणात पोलिसांना जिथे गरज असेल तिथे मदतीसाठी स्वत: तत्पर सेवा दिली. असे कोरोनात अखंड मदत करणारा योद्धा गणेश शंकर माळी, सोपान खराते, राम सोनवणे, योगीराज माळी, अनिल माळी, अरूण माळी, आरती गणेश माळी जेव्हा राजकारणी घरात बसले होते. तेव्हा हे सर्वजण आपले समाजासाठी स्वत: पुढे येवून मदतरूपी समाजसेवा करत होते. यांना मनाचा मानाचा सलाम आणि यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

योद्धा गणेश शंकर माळी व टीमचे छायाताई भगत, अप्पा घोरपडे आणि सर्व विश्व आरोग्य सेवा समितीने आभार मानले.