Home गुन्हा जळगाव डी वाय एस पी डॉ निलाभ रोहन यांच्या कारवाई ने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

जळगाव डी वाय एस पी डॉ निलाभ रोहन यांच्या कारवाई ने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

जळगाव :- प्रतिनिधी , जितेंद्र चौधरी

जळगाव शहरामध्ये अवैध धंदे बऱ्याच प्रमाणात फोफावत चालले आहे त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम जळगाव चे डी वाय एस पी डॉ नीलाभ रोहन हे चांगल्याच प्रकारे करतांना दिसत आहेत . त्यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे चांगलेच प्रकारे दणाणले आहे. त्यांनी आज सुद्धा पिंप्राळा मध्ये आठ किलो गांजा जप्त करून सलग सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव मध्ये पिंप्राळा परिसरात एक व्यक्ती गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांना मिळाल्याने घटनास्थळावर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर तसेच सुहास राऊत पोलीस नाईक रवी पाटील पोलीस नाईक गायकवाड अतुल पवार उमेश पवार यांच्यासह पिंपळा येथील निसर्ग कॉलनी शांताराम साडी समोर एक व्यक्ती येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्या नुसार सदरील वर्णनाची व्यक्ती मोटरसायकल ऊन येताना दिसल्याने त्याठिकाणी पोलिस ताफा दबा धरून बसले असता आरोपी शाहरुख सलीम खाटीक राहणार सुरेश दादा जैन नगर गेंदालाल मिल वय 26 हा आपल्या मोटरसायकल नंबर एम एच 19 सी एच 8894 या गाडीवर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो वजनाचा गांजा आढळून आला त्याची अंदाजे किंमत 40 हजार रुपये वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर हे करीत आहेत. ।।