Home ताज्या बातम्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवाहन

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवाहन

0

पुणे : परवेज शेख

सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त आवाहन

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात येते की

  1. सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण हे आपापल्या घरीच करावे कोणीही एकत्र येऊन नमाज पठण.करू नये
  2. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील सर्व मशिदी मदरसा या बंद राहतील मशिदीमध्ये फक्त मौलाना साहेब व मशिदीचे साफ सफाई करणारे यांनाच प्रवेश राहील इतर कोणीही मशिदीमध्ये जाऊ नये माननीय पोलिस सह आयुक्त साहेब यांनी मुंबई पोलिस अधिनियम कलम 37 (1)(3) प्रमाणे मनाई आदेश लागू केले आहेत
  3. मशिदीचे बाहेर सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कोणीही नमाज पठण करू नये.
  4. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व तीव्रता लक्षात घेता सर्व मुस्लिम बांधवांनी रमजान ईद नमाज पठण घरी अदा केल्यानंतर आपल्या नातेवाईक व मित्रांना प्रत्यक्ष न भेटता कोरोणा विषाणूचा धोका टाळण्यासाठी आपले मित्र नातेवाईक यांना फोनद्वारे किंवा व्हिडीओ कॉलिंग द्वारे रमजान सणाच्या शुभेच्छा द्याव्यात सर्व मुस्लिम बांधवांनी सोशल डिस्टन्सींगचे पूर्ण काटे कोरपणे पालन करावे ही विनंती आहे विनायक गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर