Home शहरे जळगाव चाळीसगावात खाकीतील अशीही माणुसकी गरीब गरजूंना मोफत किराणा वाटप

चाळीसगावात खाकीतील अशीही माणुसकी गरीब गरजूंना मोफत किराणा वाटप

जळगाव- प्रतिनिधी (जितेंद्र चौधरी )देश भरात कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरुन सर्व तो परी प्रतनांची परकाष्टा करण्यात येत आहे. त्यातच लॉकडाऊन काळात जो तो व्यक्ती आपापल्या परीने मदत करीत आहेत. त्यातच वर्दीतील देवदूतांची ही कमी नाही अशाच काही प्रकारची मदत अंबुजा कंपनी तर्फे व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः च्या पगारातून 2,25000 रुपये जमा करून हाथावर पोट असणाऱ्याना 1111 जणांना किराणा चे घरपोच जाऊन वाटप करण्यात आली आहे .चाळीसगाव परिमंडळचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोऱ्हे उपविभागीय पोलीस अधिकारी मा गावडे यांचे मार्गदर्शनाने, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी व त्याचे सहकारी सपोनि आशिष रोही, मयूर भामरे, पोउपनि जाधव व साठे व समस्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी
कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे लॉकडाउन विचारात घेता, अनेक हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबांचे रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, याची जाणीव लक्षात घेऊन

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे पगारातून जमा केलेले 2,25000 रुपये व चाळीसगाव येथील गुजरात अंबुजा कंपनी यांचेकडील सहाय्य यातून चाळीसगाव शहरातील गरजू व गरीब 1111 कुटुंबाना किराणा मालाचे वाटप त्यांचे घरी जाऊन करण्यात आले आहे.

यामध्ये गुजरात अंबुजा कंपनीकडून 4000 किलो तांदूळ व 1111 तेलाच्या बॅग असे किराणा साहित्य प्राप्त झाले असून, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जमा रकमेतून 1111 गव्हाच्या पिठाच्या प्रत्येकी 5 किलोच्या बॅग, 1111 किलो डाळ, 1000 किलो तांदूळ असा किराणा माल विकत घेऊन तो प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 लिटर तेल असे किराणा मालाचे किट एकत्रितपणे शहरातील गरजू व गरीब कुटुंबांना घरपोच देण्यात आले आहे.