Home शहरे उस्मानाबाद मारहाण धमकी भाऊबंदकी

मारहाण धमकी भाऊबंदकी

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २५ मे : आर्थिक व्यवहार, शेतीचे वाद आणि अन्य कौटुंबिक कारणांमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, परंडा आणि आंबी पोलीस ठाण्यात मरामरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस ठाणे, कळंब :  बालाजी व दविंद्र काळे , छाया काळे रा. मस्सा, ता. कळंब यांनी दि. 18.05.2020 रोजी 19.00 वा. सु. मौजे मस्सा येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन गावकरी- रविंद्र बप्पा काळे यांना तोंडावर दगड मारुन जखमी केले. भांडणे सोडवण्यास आलेल्या रविंद्र काळे यांच्या आई, भाउ यांनाही शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रविंद्र काळे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, परंडा : अनिल वामन समिंदर, विशाल समिंदर, अक्षय समिंदर तीघेही रा. हिंगणगाव (बु.), ता. परंडा या तीघा पिता- पुत्रांनी दि. 24.05.2020 रोजी मौजे हिंगणगाव (बु.) येथे पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- पांडुरंग साहेबराव समिंदर यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अक्षय समिंदर याने पांडुरंग समिंदर यांच्या कानावर धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पांडुरंग समिंदर यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आंबी : अजित अशोक सावंत रा. रत्नापूर, ता. परंडा हे दि. 24.05.2020 रोजी त्यांच्या शेतातील विहिरीवर विद्युत पंप चालु करण्यासाठी गेले होते. यावेळी भाउबंद- नवनाथ गहिनीनाथ सावंत व सोनाली सावंत या दोघांनी अजित सावंत यांना विद्युत पंप चालू करण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, तोंडावर दगड मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अजित सावंत यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 24.05.2020 रोजी नोंदवला आहे.