उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । २६ मे : उस्मानाबाद शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. नातेवाईका कडील थंड पाणी पिण्यास गेलेली मुलगी बेपत्ता झाली आहे.
या बाबत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी २५ मे रोजी फिर्याद दिली आहे. त्यात अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुलगी १७ वर्षीय असून शनिवारी २३ मे रोजी ही घटना घडली आहे.