पिंपरी चिंचवड ( प्रतिनिधी )रमेश कांबळे
देशभर वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गोरगरीब नागरिकांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना अन्न धान्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब देहूरोड च्या माजी उपाध्यक्षा रंजना सपकाळे ,आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल सपकाळे यांनी ,चिंचोली गावातील गरीब नागरिकांना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करून ,प्रत्येक गरवंताच्या घरी जाऊन हे धान्य वाटप करून ,सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
गोरगरीब गरजू की ज्यांना खरोखर एक वेळेचे का होईना ,अन्नधान्याचे गरज आहे ,अशा गरजवंतानां धान्य वाटप करताना ,देहूरोड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ज्योती वैरागर , राष्ट्रवादीच्या सविता जाधव , बाळासाहेब जाधव ,शिवसेनेचे संदीप बालघरे ,पोलीस पाटील मारुती वैरागर, तसेच मिलिंद भालशंकर ,विजय ढावरे ,अंकुश गायकवाड , पितांबर गायकवाड गणेश घोलप यांची गरजू कुंटुंबाच्या पर्यंत पोचण्यास मोलाची मदत झाली आहे.
सकपाळे कुटुंब नेहमीच गरजू नागरिकांच्या मदतीस पुढे येत असते.
यातील बहुतांश नागरिक रोजंदारीवर काम करणारे व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यांचा लॉकडाऊनमुळे रोजगार बूडाला असून त्यांना आपल्या मुळगावी देखील जाणे शक्य होत नाही. या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून माणुसकी व कर्तव्याच्या भावनेतून हे कार्य करण्यात आले असल्याचे रंजना सकपाळे यांनी सांगितले.